दिनांक २० जून २०२४ रोजी सकाळी दहा वाजता कन्याशाळा वाई शताब्दी महोत्सव व नवीन मराठी शाळा सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सत्यवती जोशी सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला सभागृहातील कार्यक्रमापूर्वी सकाळी साडेआठ वाजता ढोल ताशांच्या गजरात तुतारीच्या निनादात कन्याशाळेतून शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेसाठी महोत्सवाचे अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष, मुख्याध्यापक, आजन्मसेवक, शाला समिती सदस्य, पालक, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
जून २०२४ रोजी उद्घाटन झालेल्या या शताब्दी महोत्सवाची गुरवार दिनांक १९ जून २०२५ रोजी सांगता करण्यात आली. प्रमुख पाहुणे मा. सौ मेधा कुलकर्णी यांचे संस्थेच्यावतीने व प्रशालेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. महर्षी अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. All rights reserved
Powered by Sangraha